आज १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन ग्रँडमराठा फौंडेशन तर्फे हंसनगर, सिंगनगर खोपट ठाणे परिसरातील गरजु विद्यार्थ्यांना मोफत २५०० वह्यांचे वाटप करण्यात आले. त्यावेळी शिवसेना उपविभाग प्रमुख प्रभाकर देशमुख, युवासेना उपशहर अधिकारी मितेश देशमुख, उपशाखा प्रमुख प्रशांत पेडणेकर, आशिष कदम, प्रसाद दळवी, संतोष वाघ, दीपक रत्नपारखी, निखिल मालुसरे, अतुल आंबरे, धीरज आहिरे, जितू देवडा, दीपक बोहिनी, साशंक झुजम व सोनाली देशमुख व इतर मान्यवर उपस्थित होते.