विदर्भात प्रचंड नापिकीमुळे कृषी संकट अधिक गंभीर — किशोर तिवारीं
विदर्भात प्रचंड नापिकीमुळे कृषी संकट अधिक गंभीर : विदर्भाच्या शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा देण्यासाठी शेतकरी मिशनचे प्रमुख किशोर तिवारींचे सरकारला निवेदन
दिनांक -१८ ऑक्टोबर २०१५
सप्टेंबरपासुन बेपत्ता झालेल्या पावसाने विदर्भातील खरीप हंगामाच्या पिकांना म्हणावे तसे योगदान दिले नाही, तूर, मूग, उडीद, तिळ आदी पिके शेतकऱ्यांच्या  शेतातुन भूईसपाट झाली आहेत सोयाबिन पिकाने तर शेतकऱ्यांचा  आत्मघात केला कोरडवाहू शेतकऱ्यांना सोयाबीन व कापसाचे जेमतेम दोन ते तीन  क्विंटल पिक येत आहे  आत्महत्याग्रस्त विदर्भात  जिल्ह्यात कोरडा दुष्काळ नाही मात्र प्रचंड नापिकीमुळे आर्थिक संकट अधिक वाढले असून  यासाठी विदर्भाच्या  शेतकऱ्यांना सुद्धा दिलासा मिळावा व कापसाची खरेदी तात्काळ सर्वच संकलन केंद्रावर सी सी आय मार्फत सुरु करण्यासाठी व  नापिकीमुळे सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना खऱ्याअर्थाने दिलासा मिळावा म्हणून आपण  मुख्यमंत्र्यांशी भेट घेवुन समस्या मांडणार असुन या चर्चेतुन निश्चितच काही मार्ग निघेल, असे मत वसंतराव नाईक शेतकरी  मिशनचे प्रमुख किशोर तिवारी यांनी व्यक्त केले.
 शेतकऱ्यांसाठी  सरकारची तिजोरी रिकामी करून त्यांच्यापर्यंत मदत करायला मुख्यमंत्री तयार  असून सर्व विदर्भ व मराठवाड्याच्या १४ जिल्यात सर्व ६० लाख परिवारांना अन्न सुरक्षा ,आरोग्य सुरक्षा व शिक्षणात सवलत देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी सरकारला सादर करून  तात्काळ दिलासा देण्यासाठी  वसंतराव नाईक शेतकरी  मिशन कार्य करीत असुन लवकरच आणखी दिलासा देणारे निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती वसंतराव नाईक शेतकरी  मिशनचे प्रमुख किशोर तिवारी यांनी  एका  निवेदनाद्वारे दिली आहे .
 वसंतराव नाईक शेतकरी  मिशनचे  काम स्विकारल्यापासुनविदर्भ व मराठवाड्यातील गाव तांडे, पोड, दाड्यावर मी भटकतो आहे. आरोग्य केंद्र, आश्रमशाळांना भेट देत फिरत आहे. शेतकरी अल्पभुधारकांच्या शेत बांधावर जावून भेटतो आहे. चित्र फार विदर्ण आहे. विदर्भात आरोग्य यंत्रणेवर वारेमाप खर्च होतांना प्रा. आ. केंद्रात डाॅक्टर नसतात, परिचारिकेच्या भरवशावर काम चालते, औषधाचा पत्ता नाही, बेडवर गाद्या नाहीत, असल्यातरी नसुन सारख्याच. आश्रमशाळेत मुलांना अत्यंत वाईट जेवण मिळते. तक्रार करणार्र्यांना धाक दिल्या जातो. कृषी खात्याचे अधिकारी तर कार्यालयाच्या बाहेरच पडत नाहीत त्यामुळे या सर्व विदारक स्थितीचे आॅपरेशन करण्याची माझी तयारी सुरू आहे.
    गत तिन वर्षात सगल दुष्काळाने विदर्भ व मराठवाड्याच्या ग्रामीण भागाचे आर्थिक व सामाजिक स्वास्थ बिघडले आहे. शेतकरी आत्महत्येचे प्रकार  विदर्भ, खान्देशात, मराठवाड्यात अजुन थांबलेले नाहीत. काही प्रश्न शासनाच्या योजनातून सूटतात, अन काही प्रश्न सामाजिक जाणिवेतून सोडवण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करावा, असे मला वाटते. अभिनेने नाना पाटेकर व मकरंद अनासपूरे यांनी विदर्भ, मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या प्रकरणाची धग जाणून, ‘नाम’ फाऊंडेशनच्या माध्यमाने केलेला प्रयत्न अतिशय उत्कृष्ट आहे. या चरित्र अभिनेत्यांच्या मतदीने शेतकरी बांधवाच्या हिताच्या कार्याला प्रेरणा मिळेल
टेक्स्टाईल पार्कसाठी प्रयत्न !
राज्यातील विदर्भात ९ कापूस उत्पादक जिल्ह्यात त्वरीत टेक्स्टाईल हब तयार करण्याच्या धोरणात्मक कार्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी गंभीरतेने हात घातला आहे. यवतमाळ जिल्हा हा माझा गृह जिल्हा आहे. येथे माजी स्वतःची चळवळ जन्माला आली, वाढली त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात व ९ कापूस उत्पादक जिल्ह्यात टेक्स्टाईल पार्कच्या उभारणीला वर्तमान गतीपेक्षा जादा गती देऊन हे काम पुर्णत्वास आणण्याचा आमचा प्रयत्न कठोरतेने करू असे तिवारी यांनी म्हटले आहे.  शेतकऱ्यांचे मूळ प्रश्न पिकाला भाव व सर्व शेतकऱ्याला नवीन पीककर्ज यासाठी  वसंतराव नाईक शेतकरी  मिशनचे  काम सुरु असुन ,सिंचन ,रोजगार ,जोडधंदे ,वीज जोडणी ,आरोग्य सेवा ,शिक्षण सुविधा ,कारखाने यावर सरकारला योजना  वसंतराव नाईक शेतकरी  मिशनने सादर केल्याअसुन जे अधिकारी  व कर्मचारी शेतकऱ्यांचा सूड घेतात व पैसे घेत्यालाशिवाय काम  करीत यांचा कायम  बंदोबस्त करण्यासाठी  वसंतराव नाईक शेतकरी  मिशनचे  काम करीत असुन लवकरच ग्रामीण विदर्भात व मराठवाड्यात ह्याचा परिणाम दिसेल असा विस्वास मुख्यमंत्र्यांनी ७ ऑक्टोबरच्या आढावा बैठकीत दिल्याचे किशोर तिवारी म्हटले आहे .
 
    


