• Follow Us On
  • fb-icon
  • twitter-icon
  • instagram-icon

ग्रँड मराठा फाऊंडेशनने केली येऊरमधील आदिवासींची आरोग्य तपासणी

शिबिरात सुमारे ५०० आदिवासींचा रक्तदाब, शरीरातील ऑक्सीजन पातळी, ताप आदींची तपासणी करून त्यांना औषधे सॅनिटायझेर, साबण, मास्क आणि इतर आरोग्यवर्धक साहित्याचे वाटप करण्यात आले

कोरोना काळात प्रत्येकजण आपल्या आरोग्याबाबत सजग झाला आहे. मात्र, सद्यस्थितीमध्ये आदिवासी घटकाची कुचंबणाच होत आहे. ही अडचण ओळखून ग्रँड मराठा फाऊंडेशनने येऊरमधील आदिवासी बांधवांची आरोग्य तपासणी करुन त्यांना औषधे सॅनिटायझेर, साबण, मास्क आणि इतर आरोग्यवर्धक साहित्याचे वाटप केले.

येऊर येथील सुमारे ५०० आदिवासींचा रक्तदाब, शरीरातील ऑक्सीजन पातळी, ताप आदींची तपासणी या फाऊंडेशनच्या वतीने स्वंस्थापक रोहित शेलाटकर व विश्वस्त माधवीताई शेलाटकर यांच्या मार्गदर्शनाख़ाली व प्रमुख अतिथी म्हणुन राजेश तावडे उपस्थित होते तसेच आदिवासी बांधवांना वैयक्तीक स्वच्छता पाळता यावी, यासाठी सॅनिटायझर, साबण, मास्क या सह विविध आजारांवरील औषधांचे वाटपही करण्यात आले.
यावेळी वैद्यकीय पथकासह हेमंत जाधव, मोहन देसाई, संजय ठाकुरअमरेन्द्र तिवारी आदी उपस्थित होते.सदर शिबीर मितेश प्र देशमुख यांच्या अध्यक्षते खाली आयोजित करण्यात आले